शिवसेनेला ED कारवाईचा आणखी एक धक्का

Update: 2022-06-24 12:04 GMT

आमदारांच्या बंडामुळे संकटात आलेल्या शिवसेनेला आता आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेनच्या विविध नेत्यांवर सध्या ED अंतर्गत कारवाई सुरू आहे. याच यादीमध्ये आता अर्जुन खोतकर यांचेही नाव आले आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर EDने कारवाई केली आहे. अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील साखर कारखान्याची जमीन, यंत्र सर्व काही जप्त करण्यात आले आहे.

EDने कारखान्याची जमीन, इमारत, आतील सर्व यंत्रणा, प्रकल्प सर्व काही जप्त केले आहे. काही साखर कारखान्यांचा राज्य सहकारी बँकेने लिलाव केला होता. ते लिलाव अवैध ठरल्यानंतर PMLA अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणासंदर्भात EDने कारवाई केली आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

एकीकडे शिवसेनेच्या अनिल परब यांची गेले काही दिवस रोज ED चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर संजय राऊत, भावना गवळी यांनाही EDची नोटीस आली आहे. तर मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. आता या यादीत अर्जुन खोतकर यांचे नाव आले आहे.

Tags:    

Similar News