गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातच ईडीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहूणे श्रीधर पाटणकर यांच्यापाठोपाठ आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप संघर्ष रंगला आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात ईडीने कारवाई करत त्यांची सात कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तर आता त्यापाठोपाठ पुन्हा एकदा ईडीने थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
ईडीने संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.