शाओमी कंपनीवर ईडीची कारवाई,साडे पाच हजार कोटी जप्त

Update: 2022-04-30 14:14 GMT

शाओमी इंडीया(Xiaomi india) ही चीनच्या शाओमीच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे.कंपनीने बेकायदाशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने सया वर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरु केली होती.जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बॅंक खात्यात पडून होती.

ईडीने(ED) जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफौन ब्रॅंडपैकी एक असलेल्या शाओमीवर मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये शाओमी टेक्नोलॉजी इंडीया प्राइवेट लिमिटेड चे साडेपाच कोटी रुपये जप्त केले आहेत.विदेशी मुद्रा व्यवनस्थापन कायदा १९९९ च्या नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरु केली होती.जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बॅंक खात्यात पडून होती.

शाओमी कंपनीने तीन विदेशी संस्थांना रॉयल्टीच्या नावाखाली ५५५१.२७ कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे.रॉयल्टीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम शाओमी ग्रुपच्या संस्थेच्या सुचनेनुसार पाठवण्यात आली.ज्या तीन संस्थांना शाओमीने पैसे पाठविले त्यांच्याकडून काहीच खरेदी किंवा सेवा घेतली जात नाही,FEMA च्या कलम ४ चे उल्लंघन करत बोगस कागदपत्रे दाखवून शाओमीने हा घोटाळा केला आहे.

Tags:    

Similar News