औरंगाबाद आणि पुण्यातील विविध ठिकाणी गुरुवारी ED च्या पथकाने छापेमारी करत कारवाई केली. यावेळी औरंगाबाद येथे दोन मोठ्या उद्योजकांच्या सात ठिकाणी एकाचवेळी धाड टाकण्यात आली. ज्यात मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांचा सुद्धा समावेश आहे.
विशेष म्हणजे याप्रकरणी निरंजन गुंडे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की," ज्यांची नावे इन्कम टॅक्स छाप्यांमध्ये आढळून आली अशा आयपीएस- आयएएस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याऐवजी ईडीने थेट कारवाई सुरू केली आहे. आज ईडीने मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळ्ये यांच्यावर छापा टाकला,त्यामुळे गृहपाठ झाला असेल"
Instead of Showcause notices to IPS / IAS Officers whose names were found in the Maharashtra Tax Raids,direct action by @dir_ed has started. Today @dir_ed raided Padmakar Muley Father in Law of @MumbaiPolice Jt CP Vishwas Nangre Patil ! Homework must have been done! @Dwalsepatil https://t.co/4jyPtnfFmS
— Niraj (@NirajGunde) November 11, 2021
गुरुवारी ईडीच्या एकूण सात पथकाने एकाच वेळी औरंगाबाद मध्ये विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली होती.यावेळी सकाळी 12 वाजेदरम्यान सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ज्यात दोन्ही उद्योजकांच्या कार्यालय, कंपनी आणि इतर ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
'नागरे' कनेक्शन...
औरंगाबाद मध्ये झालेल्या ईडीच्या कारवाईत पद्माकर मुळे यांचे नाव समोर येत आहे. विशेष म्हणजे पद्माकर मुळे हे विश्वास पाटील नागरे यांचे सासरे आहेत. तर काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप करतांना विश्वास नागरे पाटील महाविकास आघाडीचे माफिया असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी लवकरच मराठवाड्यातील काही घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता.