ई पीक पाहणीवर चर्चा, बाळासाहेब थोरात यांचा राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला
ई पीक पाहणीच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पण ड्रोन द्वारे ई पीक पाहणी केली तर त्याचा अधिक फायदा होईल आणि प्रक्रिया वेगाने होईल अशी मागणी त्यांनी विधानसभेत बोलताना केली. त्यांच्या या मागणीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या योजनेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी असल्याचे सांगितले. पण त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू उपशावर देखील ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय सरकार घेणार का असा सवाल विचारला. त्यावर बाळासाहेब थोरात यांना आपण विखे पाटील यांना नकारात्मक उत्तर देऊ शकत नाही, असा टोला लगावला.