‘स्वच्छ येऊर, हरित येऊर’ साठी डायसाण फाऊंडेशनचा पुढाकार
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नैसर्गिक संपत्तीचे जतन होईल आणि त्यातून शाश्वत भविष्य घडेल
ठाणे- येऊर इथल्या डोंगर तसेच नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी ड़ायसाण फाऊंडेशनच्यावतीने येत्या ३० एप्रिल २०२३ पासून ‘स्वच्छ येऊर, हरित येऊर’ हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत दर रविवारी येऊर इथं जंगल सफारीचे आयोजन करण्यात येणार आहे. यात लहान मुले आणि सर्व वयोगटातील लोकांना सफारीचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, जंगल सफारीत सहभागी झालेल्यांसाठी गायनाचे सत्रही आयोजित करण्यात आले आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नैसर्गिक संपत्तीचे जतन होईल आणि त्यातून शाश्वत भविष्य घडेल, असा विश्वास डायसाण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अतुल राठोड यांनी दिली. रविवारी (३० एप्रिल २०२३) सकाळी साडेसहा वाजता इच्छुकांनी या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी येऊर इथे जमावे, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.