उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा जिल्हा दौरा वादळी

Update: 2021-10-22 01:21 GMT

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा जिल्हा दौरा चांगलाच वादळी ठरला आहे. या दौऱ्यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली.

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख कळंब तालुक्यातील बाहुला गावात बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी आले असता, सरकारने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे म्हणत भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी खराब झालेले सोयाबीन सोबत आणले होते. मात्र, हे सोयाबीन गडाख यांनी पाहिले नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. भाजप तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली देखील झाली.त्याचवेळी 'तू जास्त बोलू नको' असे म्हणत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर भाजपच्या कार्यकर्त्यांना दम दिला.

Tags:    

Similar News