रेल्वे फाटकामुळे भंडारा-तुमसर मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प ; नागरिकांना मनस्ताप

Update: 2021-10-15 09:15 GMT

तुमसर महामार्गवरील वरठी येथे बायपास ओव्हर ब्रिजचे काम मागील दोन ते तीन आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भंडारा - तुमसर मार्गावरील रस्त्यावरील वाहतूक गावातील जुन्या राज्य मार्गावरून वळवण्यात आल्याने दररोज या परिसरात वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांब रांगा लागून राहिल्याने दररोजच जवळजवळ अर्धा ते पाऊण तास या परिसरात वाहने उभी असतात. या परिसरात अपघातही रोजचे झालेले आहे.

दरम्यान आज गेट बंद होत असताना एका ट्रक चालकाने मुजोरीने ट्रक रेल्वे फाटकाच्या आत टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेल्वे फाटक खराब झाले, त्यामुळे जवळजवळ दीड ते दोन तास वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान वाहतूक विभागाने योग्य नियोजन करून मोठ्या व इतर वाहनांना पर्यायी मार्गाने वळवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्या संदर्भातील सूचनांचे बॅनर ठिकठिकाणी लावावे असे मत वरठीचे उपसरपंच सुमित पाटील यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News