बुलडाणा : बुलडाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील शेगाव - अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेले आहे. मागील दोन दिवसासंपासून परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला आहे. आणि यामुळे मंगळवारी रात्री पुलाचा काही भाग खचला यामुळे या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव -अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
शेगाव - अकोट राज्यमार्गावरील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर इंग्रज कालीन पूल बांधलेले आहे. सदर पूल नादुरुस्त असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. २२ जुन रोजी नादुरुस्त पुलाचा काही भाग खचला होता. तात्पूत्या दुरुस्ती नंतर ८ दिवसांनी या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र मंगळवारी रात्री पुलाचा काही भाग खचल्यामुळे या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव -अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.