मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडीमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCBने केलेल्या धाडसत्रात धक्कादायक बाब पुढे आली आहे. गुरूवारी मुंबईतील डोंगरी भागात NCBने केलेल्या कारवाईमध्ये 6 किलो एमडी ड्रग्ड, 1 किलो मेटामाईन आणि आणखी एक प्रकारचे असे एकूण 12 किलो ड्रग्स जप्त केले आहे. तर तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांची रोख रक्कम एनसीबीकडून हस्तग करण्यात आली आहे.
डोंगरी परिसरात एका लॅबमध्ये ड्रग्सचे उत्पादन केले जात असल्याचेही कारवाईमधून उघड झाली आहे. या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या गँगस्टर चिकू पठाणकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरीमधील आरिफ भुजवाला याच्या घरी एनसीबीने छापा टाकला. पण आरिफ भुजवाला सध्या फरार असून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली या कारवाईमध्ये अनेक महागडया गाड्याही एनसीबीच्या हाती लागल्या आहेत.
जे ड्रग्स जप्त केले आहेत ते साखरेच्या पिशव्यांमध्ये ठेवण्यात आले होते. चिकू पठाण हा कुख्यात गुंड करीम लाला याचा नातेवाईक असून त्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे बोलले जाते आहे.