उत्तर महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती , कृत्रिम पाऊस पाडण्याचे गिरीश महाजनांची राज्य सरकारकडे मागणी

Update: 2021-08-13 15:47 GMT

कोकण आणि पश्चिम महाराष्टात अतिवृष्टीमुळे आलेला महापुर ओसरत नाही तोच उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही भागात दुष्काळासारखी सारखी भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परीस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला.

"गेल्या दोन महिन्यापासून उत्तर महाराष्ट्रात पाऊस नाही, कापूस, सोयाबीन, मका , कडधान्य आणि इतर पिकं पार जळून गेली आहेत. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र राज्य सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही असा आरोप माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता कुत्रीम पाऊस पाडावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.", अशी माहिती महाजन यांनी यावेळी दिली. दुष्काळासाठी शेतकऱ्यांना सवलती देण्यात याव्यात यासाठी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Tags:    

Similar News