अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड, कोण आहेत जयंत नारळीकर?;

Update: 2021-01-24 13:42 GMT

नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नाशिक येथे२६ ते २८ मार्च दरम्‍यान होत असलेल्या ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकारपरिषदेत संमेलनाध्यक्ष पदाची घोषणा केली.

जयंत नारळीकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी हे पुरस्कार मिळाले असून मराठी विज्ञान कथालेखक अशी त्यांची ओळख आहे. 'यक्षांची देणगी' या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा आणि अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी विदर्भ साहित्य संघाकडून आलेले भारत सासणे यांचं नाव देखील चर्चेत होतं.

Tags:    

Similar News