लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीजबिल भरावीच लागतील, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेने वीजबिल भरु नये असे आवाहन केले आहे. वीजबिलाात 50 टक्के सवलत देतील त्या दिवशी वीजबिल भरावे, असे त्यांनी म्हटले आहे.
एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी वीजबिलात 50 टक्के सूट दिली पाहिजे अशी नोट तयार केली होती. पण अधिकाऱ्यांनी दिलेली नोट कोणत्या मंत्र्यांनी रद्द केली, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे. ते मुख्यमंत्री म्हणून वागणार नसतील काय उपयोग आहे, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.