अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे कधी कोणता निर्णय घेतील याचा काही नेम नाही. आघाडीच्या सोशल साईट्स फेसबुक आणि ट्विटरने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच की काय त्यांनी स्वतःचे सोशल मिडीया नेटवर्क सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या निर्णयाची त्यांनी घोषणा केली आहे.
"ट्रुथ सोशल" (Truth Social) असे ट्रम्प यांच्या नेटवर्कचे नाव असेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प मिडीया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) या कंपनीच्या मालकीचं "ट्रुथ सोशल" हे ऍप असणार आहे. पुढील काही महिन्यात ठराविक लोकांसाठी या नेटवर्कचा बीटा ऍप लाँच होण्याची शक्यता आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये हे ऍप प्री-ऑर्डरसाठी आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहे अशी महिती टीएमटीजी(TMTG) ग्रुपने एका निवेदनात दिली आहे.
या ऍप मध्ये व्हिडिओ ऑन डिमांड सेवा उपलब्ध असेल, ज्यात नॉन-व्होक मनोरंजन प्रोग्रामिंग देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, "मी मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या अत्याचाराविरोधात उभं राहण्यासाठी ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली आहे. तिच्या अंतर्गतच आता ट्रुथ सोशल हे नवं ऍप सुरू करत आहे. आपण एका अशा जगात राहतोय जिथे तालिबानी ट्विटर वापरू शकतात, मात्र त्याच ट्विटरवर सर्वांच्या आवडत्या माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर बंदी घालण्यात आली आहे."
दरम्यान, या 2021 च्या उदयालाच कॅपिटल बिल्डिंगमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसा केल्या होता. यामुळे ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही सोशल मिडीया साईट्स नी कारवाई करत ट्रम्प यांचं अकाउंट बंद केले होते. आता या ऍप्सना टुथ सोशल मागे सोडणार का की ट्रम्प यांचा हा बार फुसका निघणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच.
भारतात देखील या ऍप्स ना पर्यायी ऍप्स सुरू करण्यात आल्याचे आपल्याया पाहायला मिळत आहे. Koo, Hike सारखे ऍप्लिकेशन्स ऍप स्टोअर्स वर उपलब्ध आहेत. परंतू फेसबुक आणि ट्विटरचं च्या तुलनेत हे ऍप्स बरेच मागे आहेत.