मुलभुत सुविधा मिळत नसल्याने डोंबिवलीकर आक्रमक
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील स्वामी समर्थ नगर परिसरात नागरिकांनी मुलभुत सुविधा मिळत नसल्याने ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनाला मनसेनं देखील पाठिंबा दिला आहे.
डोंबिवली : पावसामुळे डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे, रस्त्यात खड्डे पडले, या भागात वीज पुरवठा सातत्याने खंडित होतो त्यामुळे मुलभुत सुविधा मिळत नसल्याने डोंबिवलीतील स्वामी समर्थ नगर येथील संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले आहे.
मागील अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. वारंवार तक्रारी करून देखील संबधित प्रशासन लक्ष देत नसल्याने डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील स्वामी समर्थ नगर परिसरात संघाच्या बॅनरखाली स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केले.
डोंबिवलीतील नागरिकांच्या या आंदोलनाला मनसेनं देखील पाठिंबा दिला आहे. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिलं आहे. लवकरात लवकर प्रशासनाने नागिरकांना मुलभुत सुविधा द्याव्यात आणि त्यांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा येत्या काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी आणि मनसेने दिला आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या या मागणीकडे कशाप्रकारे लक्ष देतं हे पाहावे लागणार आहे.