ही आजची प्रसन्न सकाळ: शरद पवार
Doing what he loves most Sharad pawar’s Daughter Supriya Sule shared photo from hospital
पोटदुखीचा त्रास जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली असून पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. इंन्डोस्कोपीद्वारे पवार यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आल्याचं टोपे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
या शास्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार दिसत आहेत.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये शरद पवार हे वर्तमानपत्र वाचतांना दिसत आहेत.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत.
असं सुळे यांनी ट्विटमद्धे म्हंटलं आहे.
Thanking Dr.Maydeo, Dr. Golwala, Dr.Pradhan, Dr.Daftary, Dr. Samdani, Dr. Tibrewala and Breach Candy Hospital Team 🙏🏻 pic.twitter.com/SlUD8jh4by
— Supriya Sule (@supriya_sule) March 30, 2021
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021