सत्ताधाऱ्यांच्या तालावर पोलीस प्रशासन नाचतयं का ? - अ‍ॅड. शर्वरी तुपकर

पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद ; सत्ताधाऱ्यांच्या तालावर पोलीस प्रशासन नाचतयं की काय? असा प्रश्न शेतकरी नेत रविकांत तुपकर यांच्या अटकेनंतर अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी उपस्थित केला आहे.;

Update: 2024-01-19 07:28 GMT

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलने करत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्राहक हेच फक्त भारताचे नागरिक नाही, शेतकरी सुध्दा भारताचा नागरिक असल्याचं अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी आंदोलनानंतर आणि रविकांत तुपकारंच्या अटकेनंतर प्रतिक्रीया दिली आहे. 

दरम्यान अ‍ॅड. शर्वरी तुपकर म्हणाल्या की "शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहोत या पार्श्वभूमीवर रेल रोकोचा रविकांत तुपकरांनी इशारा दिला होता. पण आंदोलन करण्यापूर्वीच काल त्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर मेडिकलला घेऊन जातो, असा बहाना करून तेथील शहर पोलीस ठाण्यातून काढून थेट मेहकर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. कशासाठी नेण्यात आलं? कोणाच्या आदेशाने नेण्यात आलं? याचा कोणताच खुलासा पोलीस प्रशासनाने केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. सत्ताधाऱ्यांच्या तालावर पोलीस प्रशासन नाचतयं की काय? असा असा सवाल त्यांच्या पत्नी अ‍ॅड शर्वरी तुपकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आज रविकांत तुपकरांना बुलढाणा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News