मुंबईतील शाळांना १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी ; शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा

Update: 2021-10-25 11:40 GMT

मुंबईतील शाळांना १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर झाल्याचे परिपत्रक आज शिक्षण उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी जारी केली आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिलेल्या पत्रानंतर मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांनी तिन्ही शिक्षण निरीक्षकांना दिवाळी सुट्टीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

दिवाळी तोंडावर आली तरी दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नाही, त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी २१ ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांना याबाबत पत्र लिहलं होतं. शिक्षण उपसंचालक यांनी आज सकाळीच याबाबत उत्तर, पश्चिम, दक्षिण तिन्ही शिक्षण निरीक्षकांना सुट्टीचा कालावधी जाहीर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या, त्यानुसार आता सुट्टी जाहीर झाली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी, पालक सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Tags:    

Similar News