फोडा आणि राज करा, भाजपा-काँग्रेसची समान धोरणं !" प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, आंबेडकरांनी आपल्या सोशल मीडियावर एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या धोरणांची तीव्र चिरफाड करत दोन्ही पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या सत्तेतील समानता दर्शवित, ही त्यांची धोरणात्मक रणनीती असल्याचे म्हटले आहे.
क्रीमी लेयरचा मुद्दा
प्रकाश आंबेडकरांनी एससी आणि एसटीच्या अरक्षणातील वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपा आणि कॉंग्रेसला घेरलं आहे, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपा क्रीमी लेयर आणि वर्गीकरणावर आधारित सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत आहे. याचप्रमाणे काँग्रेसनेही कर्नाटका आणि तेलंगाना येथे या क्रीमी लेयरची अंमलबजावणी केली आहे. हे लक्षात घेऊन, आंबेडकर यांनी सांगितले की काँग्रेसने या धोरणाला स्वीकारण्यास पहिले पाऊल उचलले असून भाजपाच्या अगोदार कॉंग्रेसने वर्गीकरण आणि क्रीमी लेयर लागू केले आहे.
कॉंग्रेस-भाजपा समान धोरणांचा उल्लेख
आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या धोरणांवर टीका करत म्हटले की, "भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत." या पक्षांनी अनुसूचित जातीत विभागणी करून त्यांना एकत्र येण्यापासून रोखले आहे. यामुळे समाजाच्या एकतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
आंबेडकर यांच्या मते, या दोन्ही पक्षांची भीती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शिका संघटित व्हा संघर्ष करा" हा संदेश आहे. यामुळे प्रकाश आंबेडकरांनी अनुसूचित जातीच्या लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय लाभाचा प्रश्न
आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, भाजपाने आणि काँग्रेसने आरक्षित निर्वाचन क्षेत्रांमध्ये विभागणी करून स्वतःचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर त्यांनी प्रश्न केला: "अनुसूचित जातिचे लोक कधीपर्यंत भाजपा आणि काँग्रेसच्या जाळ्यात फसणार आहेत?"
स्वतंत्र नेतृत्वाची गरज
आंबेडकर यांनी जोरदारपणे सांगितले की, अनुसूचित जातीच्या लोकांनी एक स्वतंत्र आंबेडकरी नेतृत्व निवडावे, जे त्यांच्या हक्कांचे आणि आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असेल. त्यांनी या नेत्यांना उत्तरदायी ठरवण्यावरही भर दिला आहे.