औरंगाबाद येथे निर्यातदारांच्या संमेलनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Update: 2021-09-24 10:56 GMT

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, विदेशी व्यापार महासंचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व राज्याच्या उद्योग महासंचालनालयाच्या सहकार्याने निर्यातदारांच्या संमेलनाचे औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. चिकलठाणा येथील सभागृहात निर्यातदारांच्या संमेलनाचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक डी.के. शिवदास हे उपस्थित होते 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संकल्पना व निर्यात प्रचलन उपक्रमाचे महत्वा' वर जिल्हाधिकारी यांनी विदेशी व्यापार महासंचालनालयाचे निर्याती संबंधी विविध टप्पे व प्राक्रिया, 'जिल्हा निर्यात हब म्हणून विकसित होण्यासाठीचा कृती आराखडा, चर्चा, सूचना केल्या.

जिल्‍ह्यातील निर्यातक्षम उत्पादने व सेवा यावर त्यांनी मार्गदर्शन केले,'निर्यात वाढीकरीता राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजना व प्रोत्साहन यावर देखील त्यांनी यावेळी निर्यातदारांना मार्गदर्शन केले. विदेशी व्यापार महासंचालनालय 'निर्यात प्रचालन परिषदे'वर, जिल्हा अग्रणी आहे असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

Tags:    

Similar News