शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर

Update: 2022-07-07 12:37 GMT

 सत्ता परिवर्तनात सत्तेवर आलेल्या बंडखोर शिंदे गटामधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. 2014 मध्ये मला पाडलं बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांचा एका कार्यकर्त्यांशी बोलतांना चा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे.

सत्ता स्थापनेनंतर आता शिंदे शिवसेना गटातील वाद एका ऑडिओ क्लिप मुळे चव्हाट्यावर आलाय, जळगाव जिल्ह्यातील पारोळा एरंडोल शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर आमदार चिमणराव पाटील आणि एका जामनेर येथील शिवसेना कार्यकर्त्याचा फोन वरील संवाद व्हायरल झाला आहे. पालकमंत्री असतांना गुलाबराव पाटील यांनी खूप त्रास दिला तालुक्यातील शिवसेनेने त्रास दिला 2014 मध्ये गुलाबराव यांनी पाडलं उद्धव ठाकरेंना सांगूनही त्यांनाच मंत्रिपद दिल. सरकार असूनही निधी मिळत नव्हता म्हणून शिंदे साहेबां बरोबर गेलो , मी गेल्यानंतर गुलाबराव पाटील आले.असा या संवाद मध्ये केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय राऊत यांच्या मुळे सरकार गेले अस बंडखोर शिवसेनेचे आमदार सांगत असले तरी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या एकमेकांच्या कुरघुडीमुळे शिवसेनेत फूट पडल्याच चित्र आहे.


Full View

Tags:    

Similar News