योगी सरकार कोरोनाशी लढा देणारं देशातील सर्वोत्तम सरकार आहे का?
योगी सरकार कोरोनाशी लढा देणारं देशातील सर्वोत्तम सरकार आहे का? माध्यमांनी केलेले दावे किती खरे किती खोटे? माध्यम योगी सरकारची खोटी तारीफ का करत आहेत? वाचा स्पेशल रिपोर्ट;
एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात अनेक माध्यमांनी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अज्ञात अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की, या अभ्यासानुसार उत्तर प्रदेश कोरोनाविरूद्ध जगातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यापैकी एक आहे.
न्यूजरूम पोस्टने एक ट्वीट करत म्हटलं आहे की…
"योगी सरकारच्या कोविड -१९ रणनीति चे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने कौतुक केले आणि राज्याची तुलना जगातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये केली आहें. म्
न्यूजरूम पोस्टच्या म्हणण्यानुसार, जगभरातील कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशाचा समावेश करण्यात आला आहे.
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की…
"जेव्हा संपूर्ण जग पुन्हा कोविड -१९ च्या दुसर्या लाटेत अंकल आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश सरकार एकत्रितपणे सरकारी आरोग्य यंत्रणेसोबत तयार आहे. जे व्यवस्थापन, मार्गदर्शन व कार्यप्रणाली यावर लक्ष ठेवण्यात सुसज्ज आहे.
एका वृत्तपत्राचे क्लिपिंग उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले गेले होते, ज्यात कोविड व्यवस्थापनाच्या बाबतीत राज्य पुढे असलेल्या राज्यापैकी एक राज्य असल्याचं सांगितलं आहे.
पायनियर, यूएनआय इंडिया आणि वेब वर्ल्डने हे वृत्त दिले आहे.
जॉन्स हॉपकिन्सचे प्राध्यापक डॉ. डेव्हिड पीटर्स यांनी हा दावा फेटाळून लावला.
उत्तर प्रदेशच्या एका पत्रकाराने ऑल्ट न्यूजसह राज्यातील मीडिया कर्मचार्यांसाठी बनवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आलेल्या एका संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर केला. हा संदेश एका प्रेस नोटच्या रूपात पाठविला होता.
उत्तर प्रदेश सरकार आणि जॉन्स हॉपकिन्सचा अभ्यास…
ज्या अभ्यासाबाबत बोललं जात आहे. त्या अभ्यासाचं नाव 'मर्यादित स्त्रोत असलेली व्यवस्था, कोव्हिड - १९ ची तयारी आणि प्रतिसाद' असं आहे.
उत्तर प्रदेश सरकार आणि जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाने हे तयार केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आर्थिक सल्लागार डॉ. केव्ही राजू सुद्धा यात समाविष्ट आहेत.
याशिवाय, हा अहवाल तुलनात्मक अभ्यास नाही. या अहवालात उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाची तुलना कोणत्याही देशाशी आणि राज्याशी केलेली नाही. हा अभ्यास करणाऱ्या WHO आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाच्या जॉन्स हॉपकिन्स विभागाचे प्रोफेसर डॉ. डेव्हिड पीटर्स यांनी भारतीय माध्यमांचे दावे फेटाळून लावले आहेत.
काय म्हटलंय डॉ. डेव्हिड पीटर्स यांनी…
"या प्रकरणातील अभ्यासात उत्तर प्रदेशने कोव्हिड १९ विरुद्ध ३० जानेवारी २०२० ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत उचललेल्या पाऊलांचे विश्लेषण केले आहे. कमी स्त्रोत असलेल्या ठिकाणी केलेल्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे आणि अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन शिकणे हे त्याचे लक्ष्य होते. आपण या अहवालात हे पाहू शकता की, या प्रकरणातील अभ्यासाची तुलना इतर कोणत्याही राज्याशी किंवा देशाशी केली गेलेली नाही. किंवा कोणत्या राज्याने किंवा देशांनी चांगली कामगिरी केली हे सांगितलेलं नाही.
कोव्हीड - १९ महामारी सध्या सुरु आहे. आणि अहवालात उत्तर प्रदेश सरकार कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न करेल. असं म्हटलं आहे. या अहवाला काही निष्कर्ष आणि सूचना दिल्या आहेत.
1. आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत धोरणात्मक सुधारणा
२. संबंधित एजन्सींमध्ये समन्वय आणि सहकार्याची भावना अधिक बळकट करणे
3. तयारी आणि अभिप्रायासाठी समुदायातील सदस्यांसोबत भागीदारी सुरू ठेवणे
४. प्रयोगशाळेची क्षमता वाढवून रोगाचे परीक्षण करणे.
५. अधिकाधिक निर्णय घेण्याकरिता डाटा सुधारण्यासाठी एकात्मिक डिजिटल डाटा प्लॅटफॉर्म विस्तृत करणे.
६. सार्वजनिक आरोग्य आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार्या आरोग्य कर्मचार्यांची संख्या वाढविणे आणि ते बळकट करण्यासाठी धोरण तयार करणे.
७. रुग्णांची वाढती संख्या हाताळण्याची तयारी करणे.
८. खासगी क्षेत्राबरोबर सहकार्याच्या संधी ओळखणे
न्यूजरूम पोस्ट, वेब दुनिया आणि द पायोनियर यांनी जॉन्स हॉपकिन्स च्या एका रिपोर्टचा अहवाल देऊन उत्तर प्रदेश सरकारला कोव्हिड मॅनेजमेंटसाठी काम करणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रशासन म्हणून गणलं गेले आहे. ज्या अहवालाबद्दल बोलले गेले होते तो अहवाल उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करत तयार केला गेला आहे.
असं पहिल्यांदाच झालेलं नाही की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुणगान गात भारतीय माध्यमांनी हा अहवाल प्रकाशित केला. गेल्या महिन्यातही माध्यमांनी एका दिशाभूल करणाऱ्या अहवालात म्हटले होते, की कोरोना कालावधीत, सकल राज्याच्या उत्पादनात उत्तर प्रदेश देशात दुसर्या क्रमांकावर आहे.
जानेवारीत मीडियाने टाईम मासिकामध्ये छापलेला जाहिरातीला रिपोर्ट दाखवून योगी आदित्यनाथ सरकारच्या कोरोना व्यवस्थापनाचे कौतुक केले गेले आहे. सौजन्य: Alt News