मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन

कायमस्वरूपी पगार आणि नोकरी हवी असल्याची मागणी;

Update: 2023-08-03 05:40 GMT
मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन
  • whatsapp icon

मुंबईकरांच्या कमी खर्चात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी मुंबईची बेस्ट महत्वाचा दुवा ठरली आहे. परंतु रात्रंदिवस प्रवांशाच्या सेवेत असणाऱ्या बस कर्मचारांचे काय? त्यांच्यावर अन्याय का होत आहे असं प्रश्नही उपस्थित होतं आहे. याच निमित्ताने आज मुंबईतील अझाद मैदानावर कायमस्वरूपी नोकरी, पगार वाढ हवी यासाठी धरणे आंदोलक करण्यात आले आहे.




 

यातील आंदोलक प्रज्ञा रघुनाथ गाजूरकर स्वतःच्या दोन ४ आणि ८ वर्षाच्या मुलांना घेऊन अझाद मैदानवर उपोषण करत आहे. बेस्ट कंत्राटीच म्हणणं आहे कि ते सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. सामान्य नागरिकाला त्यांच्या कामावर नेण्यापासून तर त्यांना कामावरून आणण्यापर्यंत आम्ही हि जर जबाबदारी स्वीकारत असू तर आमचा पगार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळतोय त्याप्रमाणे का मिळत नाही? आम्हाला हि तेवढाच पगार मिळावा आणि बेस्ट उपक्रमातून कायमस्वरूपी करून घ्यावे "जोपर्यंत कायमस्वरुपी करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तो पर्यंत धरणे आंदोलन सुरु राहतील. आता पर्यंत जो प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता त्यांना यश आलं नसल्याचं आंदोलकांनी सांगितले. प्रशासनाकडून फक्त आश्वासन देण्यात आली आहेत असे हि त्यांचे म्हणणे आहे म्हणून प्रज्ञा हिला सपोर्ट म्हणून मुंबईतील २५ पैकी २१ डेपोतील कंत्राटी कामगार अझाद मैदानवर धरणे आंदोलन करत आहेत.

२५ पैकी २१ डेपोतील कंत्राटी कामगार हे आंदोलनात असल्याने, बसचा टाईम टेबल विस्कळला आहे. याचा फटका मात्र सामान्य नागरिक आणि प्रवाशांना बसत आहे.

Tags:    

Similar News