विविध मागण्यासाठी आंबेडकरवादी संघर्ष पार्टीतर्फे धरणे आंदोलन

Update: 2021-10-21 12:30 GMT

भंडारा  : शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील 15 महिन्याचे थकीत वेतन देण्यात यावे, निराधार योजनेचे मागील पाच सहा महिन्यापासूनचे थकीत पैसे अदा करण्यात यावे, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणे कठीण झाले असून निराधार योजनेचे मानधन सहा हजार करण्यात यावे, दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी या आणि अशा इतर मागण्यांसाठी भंडारा येथे आंबेडकरवादी संघर्ष पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी अतिक्रमण धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा घरकुल योजनेच्या निधीत वाढ करण्यात यावी,भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे,किसान सन्मान निधीत वाढ करून वीस हजार रुपये देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

दरम्यान या मागण्या मान्य झाल्या नाही तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आंबेडकरवादी संघर्ष पार्टीतर्फे यावेळी देण्यात आला.

Tags:    

Similar News