धर्मवीर नंतर आनंद दिघे यांचा प्रवास आता पुस्तक रूपातून उलगडणार... मुख्यमंत्री करणार प्रकाशन

Update: 2022-08-26 05:47 GMT

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे बॉक्स आफिसवर हिट ठरल्यानंतर आता आनंद दिघे यांचा जीवनप्रवास असलेल्या या चित्रपटाचा प्रवास पुस्तक रूपातून आपल्या समोर येणार आहे. या पुस्तकांचं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 'एक प्रवास' आणि 'अविस्मरणीय पटकथा' अशा दोन पुस्तकांचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

सध्या राज्याचं संपूर्ण राजकारण हे ठाणे शहराच्या भोवताली फिरतंय. किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते फिरायला लावलंय. या सगळ्याची सुरूवात कुठून झाली असेल तर शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यावर आधारीत चित्रपट धर्मवीर सिनेमा! याच चित्रपटानंतर अनपेक्षित पणे राज्यात एक मोठं सत्तानाट्य घडलं आणि राज्यात सत्ताबदल झाला. आता यासगळ्यानंतर धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा देखील निर्मात्यांनी केली होती. परंतू आज २६ ऑगस्टला आनंद दिघे यांचा प्रवास आता पुस्तक रूपातून वाचकांच्या भेटीला येणार आहे. तशी घोषणाच अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे.

आनंद दिघे यांची समाधी असलेल्या शक्तीस्थळावर अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई हे दोन नवीन पुस्तकांची घोषणा करणार आहेत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक प्रवास आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे अविस्मरणीय पटकथा अशी या दोन पु्स्तकांची नावं आहेत. या पुस्तकांचं प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र ही पुस्तकांची घोषणा आहे चित्रपटाच्या पुढील भागाची नाही अशी सुचना देखील निर्मात्यांकडून देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News