Beed | राज्याचे कृषिमंत्री Dhananjay Munde यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी...

Update: 2024-04-12 15:57 GMT

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला.



बीड जिल्ह्यातील 5 तालुक्यात

97 गावातील 1020 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून यामध्ये 2183 शेतकऱ्यांना या अवकाळी चा फटका बसला आहे. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या.

मागील दोन तीन दिवसात सातत्याने बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे आंबा, डाळिंब, यांसह मिरची, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले आहेत तर उर्वरित ठिकाणचे पंचनामे तातडीने पूर्ण केले जावेत व मदतीचे अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळपिकविमा भरलेला आहे त्यांनी नुकसानीचे रिपोर्ट संबंधित कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत जेणेकरून शेतकऱ्यांना दुहेरी मदत होईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Tags:    

Similar News