Video: धनंजय मुंडे प्रकरण: चित्रा वाघ यांचं अजित पवार यांना सडेतोड उत्तर

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणात अजित पवार यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्यानंतर चित्रा वाघ यांनी अजित पवार यांना सडेतोड उत्तर दिलं आहे...;

Update: 2021-01-23 10:05 GMT

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावरून अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून भाजप मध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांचं नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी अजित पवार यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. भाजपने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यासाठी आंदोलन केले होते. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले होते. पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील. असं म्हणत चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती.



धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचं वादळ शमल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या चित्रा वाघ यांचं नाव न घेता खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका... यांनी मोर्चे काढले, सर्व गोष्टी केल्या. विरोधकांचं कामच असतं. सत्ताधारी पक्षाची एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये त्यांची बदनामी होऊ पाहते. त्यावेळी ते आवाज उठवण्याचं काम करणार. सरकारच्या मधील काही सहकारी कसे अयोग्य वागतात. हे दाखवण्याचं काम करणार, तशा पद्धतीने त्यांनी केलंय. आता ती त्यांना एका प्रकारची चपराक आहे. कारण ज्यांच्या बद्दल ते मोर्चे काढत होते. ज्यांच्यावर अन्याय झाला म्हणून जे काही बोलत होते. त्यांनीच आता केस मागे घेतली आहे. आता त्याच्यावर चंद्रकांत दादांनी सांगितलं पाहिजे. किंवा ज्या महिलांनी मोर्चे काढले. त्यांनी सांगितले पाहिजे. काही काही गोष्टीची घाई करून चालत नाही. त्याच्या संदर्भातील सर्व पार्श्वभूमी समजून घेऊन आताताईपणा दाखवून चालत नसतं. खरं काय उगीचच आपण ते करत असताना कोणावर अन्याय होणार नाही. याची पण काळजी आंदोलन करणाऱ्यांनी घ्यायची असते.

चित्रा वाघ यांचं नाव न घेता इशारा... परंतू अलिकडे झटपट आपलं नाव व्हावं. आम्ही पक्षासाठी काहीतरी करून दाखवतोय. आणि जी बाडगी असतात ना... जी या पक्षातून त्या पक्षात जातात. ते तर पहिले त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही किती या पक्षात येऊन पक्षाशी समरस झालो आहोत. पक्षामध्ये एकरूप झालो आहोत. हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. वास्तविक कोणाच्या काय काय गोष्टी आहेत. सांगायच्या ठरल्या तर वेळ अपुरा पडेल. असं म्हणत अजित पवार यांनी चित्रा वाघ यांना इशारा देखील दिला होता.

त्यानंतर चित्रा वाघ यांनी अजित पवार यांना उत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतंच मर्यादित असेल. पण मला उपमुख्यमंत्री साहेबांना हे सांगायचंय की, राज्यामध्ये अशा कित्येक पीडित आहेत. ज्यांच्यासोबत खऱ्या पद्धतीचे गुन्हे झालेले आहेत. ज्यांच्यावरती खरे बलात्कार झालेले आहेत. त्या आजही प्रतिक्षेत आहेत.

आपल्या पोलिस दलांमध्ये अशा घटनांबाबत जागृकता यायला पाहिजे. ही मागणी राष्ट्रवादीत असल्यापासून आम्ही करत आहोत. ज्या महिला पोलिस स्टेशनला जातात. त्यांच्या नावानं एफआय़आर दाखल होत नाही. आता तर एफआयआर दाखल होऊन सुद्धा आरोपी मोकाट फिरतात. आणि या केसमुळे खरोखर ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे. त्या प्रकरणातील महिलांकडे पाहण्याचा समाजाचा, पोलिसांचा दृष्टीकोन बदलू नये. यासाठी उपमुख्यमंत्री साहेब आम्ही ही मागणी केली होती. असं म्हणत अजित पवार यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. पाहा काय म्हटलंय चित्रा वाघ यांनी...

Full View
Tags:    

Similar News