Dhananjay Munde वर दुसऱ्या पत्नीचा मुलांना कैद केल्याचा आरोप, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया...

Update: 2021-02-04 10:41 GMT

राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या महिलेने केलेली कथित बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर आता रेणू शर्मा यांच्या बहिनीने मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. काही दिवसांपुर्वी धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांची करुणा शर्मा या बहिण आहेत. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत सबंध असल्याचं मान्य केलं होतं. त्याच करुणा शर्मा यांनी आता मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे.

सोशल मीडियावर तक्रारीचे पत्र व्हायरल झाल्यानंतर करुणा शर्मा यांनी बातमी सध्या न चालवण्याची विनंती केली होती. काही दिवसांपुर्वी करुणा शर्मा यांच्यासोबत आपले संबंध असून त्यांच्यापासून दोन मुले झाल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी याआधीच दिली आहे. तसेच करुणा शर्मा यांची मुलं आपल्यासोबतच राहत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

त्याच करूणा शर्मा यांनी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यांपासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. आपल्याला मुलांना भेटू दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

यासंदर्भात आम्ही करुणा शर्मा यांना संपर्क साधला, तेव्हा त्यांचे वकील श्रीकांत मिश्रा यांनी बातमी २० फेब्रुवारीपर्यंत न चालवण्याची विनंती केली.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. पण त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपले रेणू शर्माची बहिण करुणा शर्मा यांच्यासोबत संबंध असून त्याची माहिती आपल्या कुटुंबालासुदधा आहे असे कबूल केले होते. तसेच रेणू शर्मा यांचे सर्व आरोप फेटाळलेसुद्धा होते. त्यानंतर रेणू शर्मा यांनी त्रास दिल्याच्या तक्रारी इतर काही नेत्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्यावर तूर्तास कारवाई न करण्याचा निर्णय घेतला होता.

या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे... काय म्हटलंय धनंजय मुंडे यांनी... आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून मा. उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे.

सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. (इंजंक्शन) त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून मा. उच्च न्यायालयाने मा. मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे.

सदर मेडिएशन च्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशन मध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत. असे असताना आणि सहमतीने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे.

मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे. त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब ही न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही.

कृपया ही वस्तुस्थिती व न्यायालयीन प्रकरण व एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

धनंजय मुंडे

Tags:    

Similar News