राज्य शासनाविरोधात नागपूरात ओबीसी समाजाचा धडक मोर्चा

Update: 2023-09-18 11:06 GMT

नागपूर - राज्य शासनाच्या भूमिकेविरोधात आज नागपूरात कुणबी व ओबीसी कृती आंदोलन समितीच्या वतीने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं या करिता काही दिवसांपूर्वी मराठा समाजाने आंदोलन केलं होत परंतु या निर्णयाला आता ओबीसी समाजातून विरोध होत आहे. शेकडोंच्या संख्येने कुणबी व ओबीसी नागरिक या मोर्चात सहभाग झालेत. महाराष्ट्र चे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा ह्या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षण संदर्भात जी समिती नेमली आहे. त्या समिती मध्ये कुणबी समाजातील एकही व्यक्ती नाही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अट केली होती की 40 दिवसात आरक्षण दिला नाही तर कुणबी जात प्रमाणपत्र सरसकट द्यावे पण यासाठी त्या समिती मध्ये कुणबी समाजातील एक व्यक्ती असणे गरजेचे आहे ही मागणी आंदोलकांनी केली आहे.

Tags:    

Similar News