केंद्रीय पथक नुकसानीच्या पाहणीला येत नाही: देवेंद्र फडणवीस

Update: 2020-12-25 11:16 GMT

राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचं मागणी पत्र राज्य सरकारनं उशिरा पाठवलं. केंद्रीय पथक प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत नाही. ते केवळ गावकऱ्यांशी चर्चेसाठी येतात अशी सारवासारव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

शेतकरी संवाद यात्रा कृषी कायद्यांबाबत फडणवीस शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मांजरी जि. पुणे इथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसान पाहणीसाठी केंद्रीय पथक फार उशिरा आलं. त्यावर टिका होत असताना फडणवीस यांनी केंद्र सरकारची पाठराखन केली. ते म्हणाले, राज्य सरकारनेच मागणीपत्र (मेमॉरॅंडम) उशिरा पाठवले. त्यामुळे केंद्रीय पथक उशिरा आले. केंद्रीय पथक कधीच प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत नाही. ते येऊन गावकऱ्यांची चर्चा करतात आणि अहवाल सादर करतात.

केंद्र सरकारने यापूर्वीच एनडीआरएफमधून मदत केली आहे. केंद्रीय पथक योग्य अहवाल देऊन मदत करेल. राज्य सरकारकडं दारू परवानाधारकांना मदत देण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसा नाही. राज्य सरकारने आता नाटकं बंद करावी असे फडणवीस म्हणाले.

Full View
Tags:    

Similar News