शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी मागणी करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र सध्या चर्चेत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी अनेकांची इच्छा असू शकते,
पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय, जनतेचे प्रश्न आम्ही मांडतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.