देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस आरोग्य कर्मचारी, माहिती अधिकारात राज्य सरकारचं उत्तर
25 व्या वर्षी लस घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस हेल्थवर्कर, माहिती अधिकारात राज्य सरकारचं उत्तर;
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुतणे तन्मय़ फ़डणवीस यांनी कोरोना लसीचा डोस घेतल्यानं नवा वाद समोर आला होता. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या व माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातू तन्मय फडणवीस हे नातू आहेत. तन्मय यांनी नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर मोठी टीका करण्यात आली. त्यानंतर हा फोटो डीलिटही करण्यात आला होता.
देशात दुसऱ्या टप्प्यात 45 वर्ष वयोगटापुढील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत होती. त्या दरम्यान तन्मय फडणवीस यांचं वय 25 असताना त्यांना लस कशी देण्यात आली? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावरुन फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
या संदर्भात बारामतीमधील सोमेश्वर नगर येथे राहणाऱ्या नितीन यादव यांनी या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यामध्ये राज्य सरकारकडे लस घेत असताना तन्मय फ़डणवीस यांनी हेल्थकेअर वर्कर म्हणून त्यांचा उल्लेख केला असल्याची माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.
तन्मय यांच्या ट्विटर अकाउंटवर पाहीले तर त्यांनी अभिनेता असल्याचे नमुद केले असुन काही मालिकांमध्ये त्यांनी प्रत्यक्षात भुमिकाही साकारली आहे. त्यामुळं तन्मय हेल्थवर्कर म्हणून कुठं काम करत आहेत का? त्यांनी त्यांचा उल्लेख असा का केला? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.