नागपुरी बांगड्या ते शामराव फडणविशी, देवेंद्र फडणवीसांची बाजू घेणाऱ्या आमदाराला रोहिणी खडसेंचं उत्तर

Update: 2021-04-20 06:02 GMT

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मात्र, या राजकीय वैरामध्य दोन नेत्यांचं ट्विटर वॉर सुरु झाले आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. असं म्हणत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

याला आमदार राम सातपुते यांनी ट्विटर वरून उत्तर दिले ते म्हणाले...

नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात.

विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.

विशेष म्हणजे हे ट्वीट करताना त्यांनी रोहिणी खडसे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांना टॅग केले. त्यामुळे रोहिणी खडसे यांनी त्यांना जोरदार उत्तर दिलं.

ते म्हणतात...

अहो

राम सातपुते

जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?

असं म्हणत रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांच्यासह फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

अशा शब्दात वार झाल्यावर शांत बसतील राम सातपुते कसे?

त्यांनी परत ट्वीट करत रोहिणी खडसे यांना उत्तर दिलं.

भोसरी जमीन घोटाळा ..

ताई मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंच या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं तीच कारवाई झाली ना तेव्हा.

आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगर च्या जनतेने पराभव केला.

कशाला बोलायला लावता ताई..?

बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!

असं म्हणत राम सातपुते यांनी रोहिणी खडसे यांना उत्तर दिलं आहे.

राम सातपुते यांच्या या ट्विटनंतर रोहिणी खडसे शांत बसल्या नाही. त्यांनी पुन्हा एकदा राम सातपुते यांना सवाल केला...

मंत्रिपद काढले.. जर भोसरी प्रकरणात दोषी होते तर चौकशी समितीचा अहवाल विधिमंडळात का मांडला नाही ? दूध का दूध पानी का पानी केले असते. असं म्हणत राम सातपुते यांना उत्तर दिलं आहे.

एकीकडे देश कोरोनाच्या संकटात लढत असताना या दोन राजकीय नेत्यांचं ट्विटर वॉर सुरु असून यामुळं मुख्य प्रश्नापेक्षा राजकीय नेत्यांना राजकीय आरोप प्रत्यारोप महत्त्वाचे वाटतात का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Tags:    

Similar News