महाराष्ट्र सरकारला टपली मारता मारता फडणवीसांचा केंद्र सरकारला धपाटा, देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करता करता देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल...

Update: 2021-04-03 06:49 GMT


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढणाऱ्या कोरोना परिस्थितीबाबत राज्याला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत राज्यातील जनतेला अवगत केले. तसंच परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊन लावावा लागले. असा इशारा देत लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. यावेळी त्यांनी जगभरातील काही देशांचे उदाहरण देत परिस्थिती किती गंभीर आहे आणि लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असेल असंही स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला. मात्र, फडणवीसांच्या या टीकेला नेटीझन्सनी फडणवीसांनाच उत्तर दिलं आहे. 




युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय... तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.



फडणवीसांच्या या टिकेला नेटीझन्सनी फडणवीस यांनाच सवाल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या देशांची नावं सांगितली. त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी/ पंतप्रधानांनी राज्यातील जनतेला मदत केली आहे. तुम्ही देखील ही बाब केंद्राच्या लक्षात आणून द्यावी. अशा आशयाचे ट्विट फडणवीसांना उत्तर देताना नेटिझन्सने केली आहेत.

प्रथमेश शिरवडकर या ट्विटर हॅडलवरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये


आपण महाराष्ट्र सरकारला टपली मारता मारता केंद्र सरकारला धपाटा घालताय हे लक्षात येतंय का तुमच्या??? असं म्हटलंय


धैर्यशील पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यसरकारचे केंद्रसरकारकडे पैसे असल्याचा दावा केला आहे. ते पैसे आले तर आपल्याला पॅकेज देता येईल असं म्हटलं आहे.



केंद्राने जे महाराष्ट्राच्या हक्काचे २५००० कोटी दाबून ठेवले आहेत ते सध्याच्या एक्सचेंज रेट नुसार, २८ बिलियन होतात. म्हणजे बेल्जियमच्या पेक्षा ८ बिलियन जास्त. त्यातले अर्धे जरी केंद्राने दिले तरी पोर्तुगाल च्या पॅकेज पेक्षा १ बिलियन जास्त होतील.



तर प्रविण गावीत यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजचं काय झालं असा सवाल केलं आहे…


20 लाखाच्या पॅकेजचे काय झालं ? बेल्जियम देश आहे, राज्य नाही... राज्य सरकारचे GST चे पैसे केंद्र सरकारने अजूनही दिले नाहीत.


तर अथर्व नावाच्या ट्विटर यूजर ने प्रविण गावीत यांना उत्तर दिलं आहे.

अहो गावित साहेब जरा वर्तमान काळात जगत चला ना आताच तीन दिवसा पूर्वी GST कंपेंसेशन जाहीर झालं सगळ्या राज्याचं का ते दिलेले पण संपले ते बरोबर आहे म्हणा इथ 100 कोटी वसुली ते पण महिन्याला कमी पडते ते GST च टुमन कुठं वाजवायचा आणि आता किती दिले काय दिले ते जाऊद्या.




तर प्रिया सावंत या युजरने तुम्ही हे आंतरराष्ट्रीय सल्ले केंद्राला द्यायचे सोडुन महाराष्ट्र सरकारला का देताय ? असा सवाल फडणवीस यांना केला आहे.



एकंदरींत फडणवीस यांच्या ट्विटने फडणवीस यांनाच नेटिझन्सने घेरल्याचं दिसून येतंय.


काय म्हटलं होतं फडणवीस यांनी...


"होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत... आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची... युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय... तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा ! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. फ्रान्सने तिसर्यांआदा लॉकडाऊन लावला... पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले... हंगेरीत 'वर्क फ्रॉम होम'... पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती... पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज... ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठवण्यास मदत... पण, 2 लाख 20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांीना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यां्ना 800 युरोंपर्यंत मदत ! बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय. पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय... पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे... पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत... पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय... फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत... पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय..."


असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


Tags:    

Similar News