देवेंद्र फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; सचिन वाझे प्रकरणात कॉंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
सचिन वाझे प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यावेळी वाझे यांचे कोणकोणत्या व्यक्तीशी संबंध आहेत. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर चा आधार घेत सरकारवर गंभीर आरोप केले होते. यावरुन कॉंग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी न्यूज क्लिक ची एक बातमी ट्विट केली आहे. या बातमीमध्ये
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 15 मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती ३ ऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. @Dev_Fadnavis जींना मिळालेल्या CDR चा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती pic.twitter.com/H1OwuSYUjO
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
"कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीसजी मिळालेल्या CDRचा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून, ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती,"
असं म्हणत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय आहे प्रकरण?
25 फेब्रुवारी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता.
या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता.
या गोंधळामुळे 9 मार्च विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.
त्यानंतर एनआयए ने चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली. वाझे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने वाझे यांना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाझेंना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौकशी दरम्यान वाझे यांनी मोठे खुलासे केले असल्याचं एनआयए ने म्हटलं आहे.