… तर माझं नाव बदलून टाका: देवेंद्र फडणवीस

… तर माझं नाव बदलून टाका: देवेंद्र फडणवीस

;

Update: 2021-04-12 09:56 GMT

सध्या राज्यात कोरोनाने रुग्ण वाढत आहेत. राज्यात कधीही लॉकडाऊन लावलं जावं शकतं. अशात पंढरपूर येथे पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून समाधान अवताडे यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोनही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेड्यातील बोराळे येथे समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.


या सभेत त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.

महाराष्ट्रात लोकशाही नाही तर 'लॉक'शाही आहे. असं म्हणत निवडणूक असल्यामुळे पंढरपूर परिसरात वीज कनेक्शन कापण्यात येत नाही. परंतु १७ तारखेनंतर जर पंढरपूर मतदारसंघात सरकारने वीज कनेक्शन कापलं नाही तर माझं नाव बदलून टाका. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Tags:    

Similar News