रेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव किती ठिकाणी द्यायचे? असा सवाल सरकारला केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा कधीही कुठंही विरोध नसतो. परंतू या सरकारने एकदा निर्णय करावा किती जागांना? किती ठिकाणी आपण बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जे गोरेवाडा प्राणी संग्रहालय आहे. हे
गोंडवनाचा भाग असल्यामुळे आणि तिथल्या गोंड समाजाची आदिवासी समाजाची मागणी असल्यामुळे या प्राणिसंग्रहालयाला गोंडवना नाव देण्याची मान्य करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते.
असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.