रोहित पवारांच्या अॅग्रो कंपनीवरील ED कारवाईवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

Update: 2024-01-06 05:37 GMT

राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ED कडून धाड टाकण्यात आली. कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) ही बारामती आणि पुणे कार्यालयावर कारवाई केली आहे . या कावाईत काही कागदपत्रे जप्तही करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार रोहीत पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर विरोधकांवर आक्रमणाची जबाबदारी रोहित पवारांनी (Rohit Pawar) हे सातत्याने आक्रमक भूमीका घेत आहेत. त्यानंतर ईडीने (ED Raid) ही कारवाई करण्यात आल्याची विरोधकांडून चर्चां सुरू आहे. मुंबईसह सहा ठिकाणी ईडीकडून तपास केला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान यावर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले की ‘हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा... ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला... अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे, त्यांना यांसदर्भात "रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली, त्यामुळेच त्यांच्यावर अशी कारवाई होत असल्याचा आरोप के जातोय?, असा प्रश्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात असता त्यावर हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वतःला घोषित करण्याचे. रेड झालीय, नाही झाल याबाबत मला काही माहिती नाही. त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात, अशा गोष्टी बिझनेसमध्ये होत असतात. त्यांनी काही केलंच नसेल तर त्यांना घाबरण्याची गरजच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी तसेच, विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Tags:    

Similar News