फडणवीसांनी भाषणात कमवलं, सोशल मीडियात गमवलं

आत्ता तुम्ही रुपया नाही पाठवत तुम्ही आत्ता खोके पाठवता आणि रुपया मिळतो - फडवीसांच्या भाषणावर लोकांच्या प्रतिक्रीया

Update: 2023-06-24 10:57 GMT

महाविकास आघाडीचे नेते हे शिंदे-फडणवीस सरकारचा वारंवार खोके सरकार म्हणून उल्लेख करत असतात. या टीकेचाच आधार घेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केलाय.

फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करतांना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एका बहुचर्चित वाक्याचा संदर्भ दिलाय. फडणवीस म्हणाले, “ राजीव गांधी हे नेहमी सांगायचे की, मी केंद्रातून एक रूपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत त्यातले फक्त १५ पैसेच पोहोचतात. ८५ पैसे हे भ्रष्टाचारात खाल्ले जातात”. आता परिस्थिती बदललीय. नरेंद्र मोदी उस व्यक्ती का नाम है, ज्यांनी सांगितलं की, मी केंद्रातून एक रूपया पाठवेल आणि तो पूर्ण एक रूपया हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. कुणाच्या बापाची हिम्मत नाही की त्यातून एक फुटी कौडी खाईल. कुणी दलाल नाही, कुणी मध्यस्थ नाही. सरळ एक रूपया दिल्लीवरून निघाला की शेवटच्या माणसाच्या बँक खात्यामध्ये. तो बंदा एक रूपया पाठवणाऱ्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्यामुळं नरेंद्र मोदींशी तुम्ही मुकाबला करू नका, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

Full View

फडणवीस यांनी केलेल्या जोरदार टीकेनंतर नेटिझन्समधून भाजपविरोधात नाराजीचा सूर उमटलेला दिसला. फडणवीसांनी भाषणातून जरी गड जिंकला असला तरी प्रत्यक्षात मात्र नेटिझन्स भाजपवर नाराज असल्याचं दिसून आलं. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ टाकल्या नंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. अनेकाचा पहिला प्रश्न हा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हाला १५ लाख केव्हा खात्यात देणार. या व्हिडीओवर एकही पॉझीटीव्ह कमेंट नसुन सर्वच ज फडणवीसांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाब विचारत आहेत.




Ramesh Kamble

अरे चोरानो... Evm सेटिंग च्या जिवावर षडयंत्र पॉलिटिक्स

Prashant Deshmukh

आत्ता तुम्ही रुपया नाही पाठवत

तुम्ही आत्ता खोके पाठवता आणि रुपया मिळतो

Sandip Mankar

तु काही सांगू नको टरबूज्या 1नंबर चा घोटाळे बाज आहे

Raj Raju

पंधरा लाख रुपये सर्वांना मिळाले.लोक व्याज्या वर जगुन आरामात जगुन राहीलेत.गरीबी हाटली.कामगार किसान आंनदी आंनदीत.मोदिंच्या थापांवर तर लोक फार खूषित आहेत.मंदिर धर्म वर बोलूच नका,अच्छे दिन ओर क्या मंगते है.

Shivaji Bandgar

कॉम्प्युटर देशात आणणारे P M राजीवजी गांधी हेच होते म्हणुननच 1 रुपयातला 1 रुपया खाली डायरेक्ट सामान्य माणसांच्या खात्यात पोहोचतोय कॉम्प्युटरला विरोध करणारे कोण होते ??? सांगा

Dhodiram Khonge

त्यांच्या पेक्षा तुम्हीच जास्त..भ्रष्टाचारी. ahesa

Mahendra Deshmukh

14च्या अगोदर चा काय बोलला झाली काय संपूर्ण कर्ज माफी वाढले काय सोयाबीन कपाशी चे भाव एक नंबर चा खोटे बोलणारा महाराष्ट्रातील नेता आणि ई डी आणि सि बी आय च्या भरोशावर आपली पोळी भाजणारा




 


Sajjansingh Rane

Railway, Airport, costal belt,bank ,Lic, RBI money , संस्था,रस्ते सगळं काय विकलं विकास च्या नावाने,ते पण सांगा ओरडून,गधाराना खरेदी करायला पैसे वापरले

Muneshwar Tembhurne

#नेते

85 पैसे खाणारेपण काँग्रेसला दोष देतात....

आणि तुमच्याच जवळ येतात.....…

Mohan Sawale

एक रुपये च काय बोलताय 15 लाख 2014 पासून यायलेत




 


Govind Mire

15 लाख देईल म्हटल आणी नाही दिले त्याचे नाव?2 करोड वर्षाला नोकरी देईल म्हटल आणी नाही दिले त्याच नाव? देश नही बिकने दुन्गा म्हटल आणी देशाची संपत्ती विकतच सूटले त्याच नाव? ना खाऊन्गा न खाने दुन्गा म्हटल आणी सर्व खाऊन विदेशात पळवल त्याच नाव? सब का साथ सब क… See मोरे




 


Mangesh Fule

नोटा छापखाण्यातून छापुन झाल्यानंतर 88000/- करोड रुपये RBI BANK ला पोहोचण्यापूर्वी कुठे गायब झाले ?

15000/- लाख रुपये काय झाले

वारे अच्छे दिन ? … See more

Vijay Bokade

फेकूच्या काळात तर जनतेच्या वाट्याचे15 पैसे सुद्धा फेकू मिञांच्या खात्यात टाकतो आणि ऐश करतो.





 


Tags:    

Similar News