अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणी सचिन वझे यांच्या कनेक्शनची चौकशी करा - फडणवीस

Update: 2021-03-05 08:30 GMT

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडून गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या सचिन वझे यांच्याकडून तपास काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे का दिला गेला असा सवालही त्यांनी विचारला आहे. ज्या व्यक्तीची गाडी चोरुन त्यात स्फोटकं ठेवली गेली होती, ती व्यक्ती ठाण्यात राहणारी आहे आणि ती व्यक्ती सचिन वझे यांच्या संपर्कात गेल्या काही महिन्यांपासून होती, हे त्यांच्या फोन कॉलवरुन दिसते, असा दावा फडणवीस यांनी केला. तसेच गाडी सापडली तेव्हा सगळ्यात आधी तिथे सचिन वझेच कसे पोहोचले, त्यांनाच धमकीची चिठ्ठी कशी मिळाली असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

जैश उल हिंदच्या नावाने एक पत्र दाखवून खंडणी मागण्याकरीता हा प्रकार केला गेल्याचे दाखवले जाते आहे का, त्यामुळे हे दहशतवादी कृत्य असल्याचे दिसत असल्याने याची चौकशी NIAकडे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Full View


Tags:    

Similar News