समृद्धी महामार्गावर ( SamruddhiMahamarg) बुलढाण्यात बसला आग लागली आणि 25 निरपराध जीव गेले, शहापूरजवळ (Shahapur)काम सुरू असताना क्रेन कोसळलं आणि 17 निरपराध कामगार गेले, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. सर्वसामान्य नागरिक कामगारांचे विकासाच्या नावावर जीव जात असताना सत्तेतले नेते मात्र इव्हेंट मध्ये मश्गुल आहेत. विकासाच्या नावावर होत असलेल्या भव्य महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांमध्ये नेमकं कोणाचे हित सामावलं आहे. पृथ्वी शेषनागाच्या नवे तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे असं सांगणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ( Annabhausathe) यांच्या जयंतीदिनी 'मॅक्स किसान'चे संपादक विजय गायकवाड यांनी कथीत विकासाच्या 'डेडलाईन' ते 'डेडलाईन' या प्रवासावर टाकलेला झगझगीत प्रकाश...