पतीवर कारवाई व्हावी म्हणून मुलासह महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

पहिल्या पत्नी सोबत फारकत न घेता दुसरं लग्न केल्याने पहिल्या पत्नीने आपली फसवणूक झाल्याचे म्हणत, पोलीस आपली तक्रार घेत नसल्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.

Update: 2021-07-28 02:22 GMT

धुळे// पहिल्या पत्नी सोबत फारकत न घेता दुसरं लग्न केल्याने पहिल्या पत्नीने आपली फसवणूक झाल्याचे म्हणत, पोलीस आपली तक्रार घेत नसल्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.

धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिरपूर तालुक्यातील कजबे कऱ्हाड येथील मेनका देविदास मोरे या महिलेने उपोषण केलं असून , पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.

मेनका मोरे यांच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. मेनका आणि देविदास यांना एक मुलगा असताना फारकत न घेता त्याने दुसरे लग्न केले.याबाबत पोलिसात तक्रार देण्यासाठी हेलपाटे मारून देखील पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

पती देवीदास मोरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मेनका यांनी केली आहे. पतीवर योग्य कारवाई करत आपल्याला न्याय मिळावा असं मेनका मोरे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News