भल्या पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ऑन फिल्ड

आज भल्या पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ऑन फिल्ड आलेले दिसले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात तसेच परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. सकाळी सहा वाजताच ऑन फिल्ड येते उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना कामांच्या दर्जाबाबत काही सुचना केल्या.;

Update: 2021-07-31 05:59 GMT

बारामती: आज भल्या पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ऑन फिल्ड आलेले दिसले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात तसेच परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. सकाळी सहा वाजताच ऑन फिल्ड येते उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना कामांच्या दर्जाबाबत काही सुचना केल्या. सकाळी लवकर काम सुरू करणाऱ्या नेत्यांपैकी अजित पवार हे एक नेते आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 6 वाजता त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. शहरातील अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय, निरा डावा कालव्याचे सुशोभीकरण, क्रीडा संकुल, कऱ्हा नदी सुशोभीकरण या सुरू असलेल्या कामांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत पाहणी केली.

दरम्यान आपल्या तालुक्यात होत असलेल्या विविध विकासकामांवर बारकाईने लक्ष देत , ही कामे अधिक दर्जेदार कशी होतील यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अजित पवार मुंबई असो पुण्यात असो किंवा बारामतीत असो ते आपल्या कामाची सुरूवात सकाळी सहा वाजल्यापासूनत करतात. त्यामुळे अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांची धांदल उडते. त्याचाच प्रत्यय आजही बारामतीत आला. भल्या पहाटे सकाळी 6 वाजता अजित पवारांनी आपला दौरा सुरु केल्याने अधिकाऱ्यांनी चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी त्यांनी प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

Tags:    

Similar News