उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची केली विचारपुस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांवर काही दिवसांपूर्वी अँजियोप्लास्टी झाली आहे. अजित पवार यांनी आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.