गाव तिथे देवराई झाडांची चळवळ ही अनेक वर्षांपासून चालवले जाते. रघुनाथ ढोले यांच्या संकल्पनेतून देवराई संकल्पना राबवण्यात येत आहे. साधारणपणे तीस वर्षांपासून ही देवराईची चळवळ चालू आहे. सरकारी नोकरी सोडून कायमस्वरूपी पर्यावरणावर काम करण्यासाठी पूर्णवेळ रघुनाथ ढोले यांनी ही चळवळ राबवली आहे. आज पर्यंत दहा लाखाहून वृक्ष लागवड त्यांनी मोफत केली आहे.