लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याची मागणी

थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी धुळे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याची मागणी होत आहे.;

Update: 2021-08-01 09:32 GMT

थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरात लेनिन चौकात समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

गेल्या कित्येक वर्षांपासून धुळे शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, धुळे पालिका प्रशासनाने अद्याप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

पुढील वर्षापर्यंत लवकरात लवकर धुळे मनपा प्रशासनाने या संदर्भातील दखल घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा धुळे शहरामध्ये उभारावा अशी मागणी यावेळी प्रशासनाला करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News