कोरेगाव भीमामधील विजय स्तंभावर लावण्यात आलेल्या एका शिळेला विरोध
कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभावर काही वर्षांपूर्वी कुणाचाही परवानगी न घेता एक शिळा बसवण्यात आली आहे. ती शिळा काढण्यासाठी सध्या लोकशाहीच्या मार्गाने काही सामाजिक कार्यकर्त्यांचा संघर्ष सुरू आहे. काय आहे हे प्रकरण ते पाहा....;
कोरेगांव-भीमा येथे झालेले युद्ध हे जगाच्या इतिहासातील अनेक अदभुत आणि वैशिष्ट्यपूर्ण युद्धांपैकी एक मानले जाते. ब्रिटिश आर्मीत असणाऱी महार बटालियन विरुद्ध पेशवे असे हे युद्ध होते. यात 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 25 हजार सैन्याचा पार धुव्वा उडवला. या अदभुत युद्धाचे स्मरण आणि गौरव म्हणून ब्रिटीशानी कोरेगांव-भीमा येथे जयस्तंभ उभारला. मात्र 3/4 वर्षा पूर्वी कुणीतरी पुरातत्व विभागाची परवानगी न घेता 1965 आणि 1971 च्या लढ्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या नावाची नोंद असणारी एक नवी शिळा जो ऐतिहासिक ठेवा आहे त्यावर लावली आहे.
याच्या विरोधात गेली 3 वर्ष शुभम अहिवळे, सर्जेराव वाघमारे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करून हा फलक काढून टाकावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी यासाठी 10 दिवसांचे चक्री उपोषण देखील केले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेला बोलावले आणि चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे याबद्दल सांगत आहेत ऍड. बी. जी. बनसोडे