#FarmerProtest : राजधानीत अराजक, आंदोलनात राजकीय पक्षांचे गुंड घुसल्याचा शेतकरी नेत्यांचा आरोप

Update: 2021-01-26 09:27 GMT

गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन कऱणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिल्लीमधील ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. दिल्लीमधील मोर्चाचा ठरलेला मार्ग सोडून आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर धडक मारली. तिथे या आंदोलकांनी सुरक्षा भेदत किल्ल्याच्या दर्शनी भागावर शेतकरी संघटनेचा ध्वज फडकावला. शेकडो आंदोलक लाल किल्ल्यामध्ये घुसले आहेत.

तर दिल्ल्लीच्या विविध भागांमध्ये आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे. यामध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत. पण या हिंसक आंदोलनाला राजकीय पक्षांचे गुंड जबाबदार आहेत आणि तेच या आंदोलनात घुसून हिंसक कृत्य करत असल्याचा आरोप शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी केला आहे. टीकैत यांनी एका वृत्तसंस्थेला ही प्रतिक्रिया दिली आहे.

Tags:    

Similar News