मूर्ती तोडली कुणीतरी, बातमीत मात्र मुस्लीम अँगल

मूर्ती तोडली कुणीतरी, बातमीत मात्र मुस्लीम अँगल, सुदर्शन टीव्हाचा कारनामा;

Update: 2021-04-15 09:14 GMT

मंदिरात तोडफोड करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सुदर्शन न्यूजने हा व्हिडिओ ट्वीट करत म्हटलं आहे की…

द्वेषाच्या वादळात तावडीत आले दिल्लीतील आणखी एक मंदिर. 

सुदर्शन न्यूजने घटनेचा आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये रिपोर्टर मंदिरात तोडफोड केल्याची दृश्ये दाखवत आहेत .

सुदर्शन न्यूजचे मुख्य - संपादक सुरेश चव्हाण यांनी सुदर्शन न्यूजच्या ग्राऊंड रिपोर्टवर ट्विट करत म्हंटल - "जिहादींनी मूर्ती फोडल्या त्याच मंदिराचा ग्राउंड रिपोर्ट."

https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2FSudarshanNewsTV%2Fstatus%2F1381932363970572288&widget=Tweet

भाजपा दिल्ली माध्यमांचे प्रमुख नवीन कुमार यांनी हा व्हिडिओ ट्वीट करून मंदिर पाडण्याच्या मागे जिहादींचा हात असल्याचा दावा केला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सुद्धा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी एकत्रितपणे विहिंप कामगारांचा घटनेला विरोध दर्शविणारा व्हिडिओही ट्विट केला आहे.

याशिवाय सुदर्शन न्यूजचे रिपोर्टर निमित त्यागी, आणि भाजप सदस्य संदीप ठाकूर यांनीही या घटनेविषयी ट्वीट केले आहे.

काय आहे सत्य?

ट्विटरवर अनेक नामांकित लोकांनी या व्हिडिओद्वारे विविध दावे केले. तेव्हा द्वारकाच्या डीसीपींनी घटनेची माहिती देताना ट्वीट केले. त्याने सांगितले की…


या प्रकरणात त्याच भागात राहणारा महेश नावाच्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणताही सांप्रदायीक भाग नाही.

या संदर्भात द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने 13 एप्रिलला एक रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये पोलिसांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला महेश भारत हा विहार जेजे कॉलनीत राहत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची प्रथम माहिती मंदिरातील ब्राह्मणांनी दिली होती, त्यांनी पहाटे 3 वेगवेगळ्या ठिकाणी खंडित हनुमान मूर्ती पाहिल्या होत्या. महेशने असं करण्यामागे तो देवावर नाराज असल्याचं त्याने सांगितलं. त्याने रागात असताना ही कृती केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

मात्र, सुदर्शन टीव्हीच्या या चुकीच्या बातमीमुळे लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात Alt News ने वृत्त दिलं आहे.



 


Tags:    

Similar News