दिल्लीत कोरोनासह ऑक्सिजनचं मोठं संकट, डॉक्टरसह 8 लोकांचा मृत्यू

Update: 2021-05-01 11:11 GMT

दिल्ली च्या बत्रा रुग्णालयात आज दुपारी एका डॉक्टरसह आठ लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. या आठवड्यातील दिल्लीती ही दुसरी घटना आहे. या संदर्भात बत्रा रुग्णालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे.

रूग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासाभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तीमध्ये मरण पावलेल्या डॉक्ट हे गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट होते. ते कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना कोरोना झाला होता. त्यांचाही ऑक्सिजन नसतानाच्या या काळात मृत्यू झाला. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी १२ वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आम्ही आमच्या एका डॉक्टरसह रूग्णांचा मृत्यू झाला." असं न्यायालयाने दिल्ली उच्चन्यायालयाला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. या रुग्णालयात सध्या 307 रुग्ण असून यापैकी 230 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत.

Tags:    

Similar News